जय नारायण म्हणा !!
ओळखलंत का मतदार हो मला
पोटनिवडणुकीत आला कोणी थिजलेला
कपडे होते पांढरे शुभ्र
डोक्यावरती गांधी टोपी
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
शिवसेनेत बंडाळी माजली
गेले पद वाहून
भरल्या हाती धाडतील कसा
राजीनामा देऊन बसलो
कॉंग्रेसला घेऊनसंगे लढतो आहे
ंमतदारांना साकडे घालतो आहे
खिशामध्ये हात घालीत
हसत हसत उठला
चहा नको मतदार हो माला
जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला सेनेतला संसार
तरी मोडला नाही कणा
मतदान यंत्रावरील दुसरे बटन दाबून
फक्त जय नारायण म्हणा !
( विडंबन )
...............
Thursday, April 22, 2010
Tuesday, March 30, 2010
'ऑल इज वेल "
ंमुंबईतील मराठमोळी वस्ती. लाऊड स्पीकरवर हिंदी सिनेमातील नव्या हीट गाण्यांसह मराठीची कोंबडी पळाली आणि आयचा घो येडा झाला काय रे अशी रापचीक मालाची गाणी वाजत असतात. अधूनमधून श्री प्रभुरामचंद्रांची महती सांगणारी गाणी देखील सुरू आहेत. येथूनच निघालेल्या विष्णू आणि नारदाच्या कानावर ही गाणी पडतात. त्यामुळे विष्णूचे कुतूहल जागृत होते. ते नारदाला विचारतात.
विष्णू : गवरी, गणपती, शिमगा सगळे झाले. आता हा आणि कसला उत्सव आहे.
नारद : देवा असे काय करता. आज प्रभू रामचंद्र नाही का जन्माला येणार ?
विष्णू : अरे हो. लक्षातच नाही राहिलं माझ्या. पण ही रापचीक माल है सारखी गाणी कशाला इथं ?
नारद : देवा तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आपल्या गणेशासह प्रभू राम ते अगदी रामभक्त हनूमानालाही या सारख्या गाण्यांची सवय झालीय. दरवर्षी ते पृथ्वीवर येतात. त्यांना माहीत आहे सगळं
विष्णू : असो, चल आपणही राम जम्मोत्सवात सहभागी होऊ या
नारद : चला तर मग
(दोघेही राम जन्म पाहायला थांबतात. दुपारचे बारा वाजतात. राम जन्माला येतो, 'राम जन्मला ग बाई राम' अशी हाकाटी होते. मात्र यावेळी थोडं विपरीत घडलं दरवर्षी हासणार राम यावेळी मात्र हसला नाही. त्यामुळे सारेच चिंतेत पडले.)
विष्णू : रामाच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का? तो हसतही नाही.
( सगळे भक्त रामला हसवण्यासाठी प्रयत्न सुरू करता. कोणी खेळणी आणतो, कोणी धन्युष्य बाण हातात देतो, पण काही उपयोग होत नाही.)
नारद : देवा मला वाटतं प्रभूरामचंद्राचं काही तरी बिनलं असणार. पृथ्वीवर रामराज्य आणण्याची भाषा केली जाते. पण येथे महागाई, बेकारी, दहशतवाद, दारीद्रयाने जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
विष्णू : हो खरय तुझं राम राज्य म्हणजे सुरक्षा, सुबत्ता, स्थैर्य यांचा मिलाफ असतो. पण रामाला आपल्या खऱ्या राज्यात दहा तोंडाच्या रावणाला मारणं शक्य झालं. मात्र आता सर्व सामान्यांसमोर उभ्या राहिलेल्या समस्या रुपी रावणाला कसं मारायचं याची चिंता पडली असणार. लोकांच्या अपेक्षेला आपण उतरलो नाही तर आपणावरही कोणी विश्वास ठेवणार नाही असे त्याला वाटतयं
(विष्णू मनाशी निर्धार करतात आणि रामाच्या कानाशी जाऊन पुटपुटतात 'ऑल इज वेल" आणि रामाच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं.)
..............

Saturday, February 6, 2010
राहुल आला-
बया बया माझ्या मुंबैत
आज राहुल आला
राहुल कसा म्हणू
युवराज तो कांग्रेसचा
रस्त्यांना फुटले पाय
झोपड्या, चाळी घेई धाव
घारीपरी हेलिकाप्टर त्येचे
घेई "पवनहंस'चा ठाव
मुख्यमंत्री वराडला
म्हणा झिंदाबाद म्हणा
देवापरी आला दिल्लीतून
आला आपला कांग्रेसचा राणा
पोलिसांच्या हाती दंडुके
नेत्यांच्या हाती हार
मंत्री चपला उचलून
त्येचा हलका करी भार
हेलीकाप्टरातला युवराज
चालू लागे झराझरा
बया बया रूप त्येचं
जसा पौर्णिमेचा चंद्र खरा
थवा जाई रमाबाईनगरात
म्होरं गांधी टोपीवाले
मागे करवादती शिवसैनिक
थोर नेते खादीतले
कुठे व्हाती उघडी गटारं
कुठं चिखलाचा सडा
युवराज हिमतीचा
उड्या मारी तडातडा
वाटेवर रेटारेटी
गर्दी झाली येडीपीशी
युवराजा न्याहाळत वस्ती
काही बोले मंत्र्यापाशी
कुठे बॅंकेत घुसे
पुसे कसं काय ?
मॅनेजर विस्फारी डोळे
खाली लटलटे पाय
कुठे लोकलमध्ये शिरे
म्हणे प्रवाशास आत
कैसा चाले ? प्रवाशाचे
जाती घशामंदी दात
घोळका आला मैदानावर
युवराज बोले जनतेशी
त्याची दिल्लीवाली भाषा
त्यासनी कळल कशी
अशा डौलडांगोऱ्यात
त्येची झाली मुंबैय फेरी
असा नवरा देरे देवा
म्हणती कालेजच्या मॉड पोरी
राहुल आला राहुल गेला
पुन्हा हेलीकाप्टर उडे
समदे मुंबैकर चक्रावून
बघतात आकाशाकडे
....................
( मुळ कविता 'राजा आला' कवी कुसुमाग्रज यांची )
Friday, January 29, 2010
मोबाईल वेड !
पृथ्वी भ्रमणावर आलेले विष्णू आणि नारद दोघेही चालू लागतात. विष्णू आज काहीसे अस्वस्थ आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव नारदाच्या नजरेतून सुटले नाहीत. "देवा काय झाले तुमची चर्या उतरलेली का ?', अशी चौकशी नारदाने एकदा करून पाहिली. पण त्यात यश काही आले नाही. भगवंताचे नक्की काय बिनसले असेल. मुंबईतले हे हेक्टीक लाइफ बघून उबग आली तर नाही ना ? तेवढ्यात एक मुलगी समोरून येताना दिसते. मान थोडीशी खाली करून हातवारे करीत हळू आवाजात बोलत बोलत त्यांच्या बाजूने निघून जाते. तिची काही निसटती वाक्ये दोघांच्या कानावर पडतं. " यु लव मी ना ! मग आपण आज भेटायचे नक्की. तू आला नाहीस तर बग मी तुझ्याशी कधी कधी म्हणजे कधीच बोलणार नाही' तेवढ्यात एक वेगवान गाडी तिच्या अगदी जवळून जोराने हॉर्न वाजवून निघून जाते. ती पुन्हा भानावर येते व बोलत बोलत चालू लागते. दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहतात.
सुटाबुटातला एक गृहस्थ हातवारे करीत रागा रागाने बोलत होता. त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता. बोलता बोलता त्याची समोरून येणाऱ्याशी धडक लागली. त्याने दोन शिव्या हासडल्या. कट्यावर बसलेला एक तरुण एकटाच खोखो हसत होता. त्याचे वेडेवाकडे हातवारे सुरू होते.एक सधू देखील साक्षात देवाशी संवाद साधत असल्याच्या आविर्भावात जाता दिसला.
विष्णू : नारदा हा काय प्रकार आहे ? या मर्त्य मानवाला झालेय तरी काय. मी इथे आल्यापासून पाहतो. चालताना, गाडी चालवताना सर्वत्र लोक असे वेड लागल्यागत का वागतायत.
नारद : देवा मानवाने एक असे यंत्र शोधून काढले आहे की त्याला आपल्यापासून हजारो योजने दूर असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. अगदी झटपट. भक्ती पंथाला लागलेले साधू संन्याशांनाही या यंत्राचा मोह आवरला नाही. मेनके पेक्षा भारी आहे हे यंत्र.
विष्णू : म्हणजे ती व्यक्त आपल्या समोर नसतानाही आपल्याला तिचा आवाज येऊ शकतो.
नारद : हो देवा बरोबर. त्या वस्तूला भ्रमणध्वनी असे म्हणतात.
विष्णू : अरे पण मला तर त्यांच्या हातात असले कोणते यंत्र दिसले नाही बुवा
नारद : देवा त्यांच्या कानात तुम्हाला काही तरी दिले ना. त्याला "इयरफोन' म्हणतात. म्हणजे ते त्या भ्रमणध्वनीशी जोडलेले असतात. त्यामुळे हात मोकळे ठेवून बोलता बोलता इतर कामेही करता येतात.
विष्णू : सुंदर अति सुंदर ! या मानवाच्या बुद्धीची तारीफ करावी तेवढी कमी. पण नारदा मला एक धोका जाणवतो. भ्रमणध्वनीवर असे कुठेही आणि कसले भान न बाळगता बोलणे धोकादायक आहे. अशा ने अपघात होऊ शकतो. असे लोक अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा या चांगल्या गोष्टीचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करावयास हवा.
(तेवढ्यात मोबाईलचे एक दुकान दिसते.विष्णूची पावले दुकानाकडे वळतात. दोघेही तीन मोबाईल खरेदी करून बाहेर येतात. तेव्हा विष्णूचा चेहरा खुललेला असतो. नारदाला देवाच्या नाराजीचं कारण आता उमगतं लक्ष्मीच्या आठवणीनं व्याकूळ झाले विष्णू लक्ष्मीला कॉल करतात.)

Wednesday, December 30, 2009
परप्रांतीय थंडी
वूलनचा जाड स्वेटर घातलेले विष्णू कडाक्याच्या थंडीमुळे हातावर हात घासताहेत... सीगारेटचा धूर सोडावा तसं तोंडाने गरम वाफ बाहेर सोडत... नारदा आपण हिमालयाच्या आसपास तर नाहीना ? केवढी रे ही थंडी.
नारद : काय ? मला निटसं ऐकू आलं नाही.
विष्णू : (चिडक्या स्वरात ) आधी ती कानाला लावलेली 10 रुपयांची कानपट्टी काढ बघू
नारद : (इअरफोनसारखी कानपट्टी काढत) देवा, हिमालय वगैरे काही नाही आपण अजून मुंबईतच आहोत. ही उत्तरेकडची लाट आहे असं म्हणतात...
विष्णू : अरे, मागे तर सांगत होतास उत्तरेकडून लोंढे येतात. लोंढ्यामुळे इथला मराठी माणूस "परेशान" आहे. आता ही लाट कसली ?
नारद : थंडीची ! देवा उत्तरेतून परप्रांतीयांच्या लोंढ्यासोबत आता थंडीच्या लाटाही येऊ लागल्यात...
विष्णू : काय रे, या लाटेबाबात कोणी काही बोलत कसे नाही...
नारद : "मनसे'वाले साहेब उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जातात. आता थंडीच मुंबईत आलीय त्यामुळे त्यांनी या परप्रांतीय थंडीबद्दल आंदोलनाचे फर्मान काढले नाही. परप्रांतीय थंडी इथे सहन केली जाणार नाही असा इशारा दिल्याचेही ऐकिवात नाही. विरोधकांची टीका सुरूच आहे.'मनसे'वाले गारठले म्हणून ... कॉंग्रेसचे नेहमीच वेलकम आणि शिवसेनासुद्धा शेकोट्या पेटवून परप्रांतीय थंडीच स्वागत करताहेत.
विष्णू : अरे बाबा, आवर स्वतः:ला. मी तुला विचारले काय ? आणि तू बडबडत काय सुटलास... मी विचारतो हवामान खातं काय म्हणतय ? लोकांची काय प्रतिक्रिया आहे.
नारद : लोक एकदम खूष ...थर्टी फस्टच्या मुहूर्तावर थंडी हजर झाल्याने मुंबईकर खूष आहेत.
तेवढ्यात एका ठिकाणी काही लोक शेकोटी पेटवून बसलेले दिसतात... त्यात मराठी माणसासह खांद्यावर गमछा टाकलेला भय्या, आणि लूंगीवाला अण्णा सारेच असतात... नारद आणि विष्णू दोघे त्यांना जॉईन करतात....
.................

Tuesday, September 1, 2009
भक्तीच ओंगळ रूप...

भगवान विष्णू नारदाला सोबत घेऊन पृथ्वीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. विष्णू आता पृथ्वीवरून परत केव्हा येतील याचा नेम नसल्याने नाराजीनंच लक्ष्मी त्यांच्या प्रवासाची तयारी करीत होती. तेवढ्यात पार्वती घाईघाईत प्रवेश करतात. विष्णूला प्रणाम करीत त्या हातातला मोदकाचा डबा पुढे करून "येवढा माझ्या गणेशाला द्या', असे आवर्जून सांगता. लवकरच परत येतो अशी लक्ष्मीची समजूत घालून विष्णू व नारदाने पृथ्वीच्या दिशेने कूच केली...
दोघेही चंद्रा जवळून जात असताना अचानक एक वेगवान वस्तू त्यांच्या जवळून निघून जाते. दोघे ही दचकून त्या दिशेने पाहत राहतात...
विष्णू : नारदा पाहिलंस काही तरी वेगाने निघून गेले. काय होते ते ?
नारद : देवा कदाचित ते भारताचे चंद्रयान असावे
विष्णू : चंद्रयान !
नारद : हो ! हल्ली माणसं अशी यानं पाठवून विश्वात आपल्या कोणी सोबती आहे काय याचा शोध घेत असतात. अशी अनेक यान निकामी होऊन मग अंतराळात फिरतात. येथेही नुसता कचरा झालाय पृथ्वीसारखा.
(दोघंही पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. प्रथम मुंबईत उतरतात, दोघंही सामान्य माणसाचा वेश धारण करून दृष्य स्वरूपात वावरू लागतात. )
विष्णू : अरे आपले एक महत्त्वाचे काम आधी करू. बाळ गणेशाला हे मोदक आधी पोहचते करू मग निवांतपणे फिरू (दोघेही लालबागला येतात.) कसली ही केवढी गर्दी आणि या लांबच लांब रांगा
नारद : देवा आपल्या गणेशाची भक्त मंडळी आहेत सारी. इथला गणपती नवसाला पावतो अशी यांची श्रद्धा आहे म्हणे.
विष्णू : त्या शेजारच्या गल्लीतील असणाऱ्या गणपतीकडे कोणीच जात नाहीय... हा काय प्रकार आहे. अरे आमची रूपे सारी एकच असताना. ही माणसं अशी का वागतात... आणि त्या मूर्तीच्या गळ्यात नोटांचे हार कशाला, सोनं, नाणं दान म्हणून का देतात. माला काहीच काळत नाही... आपल्या गणेशाला मोदक आणि दूर्वा सोडून हे कधी पासून आवडायला लागले.
नारद : देवा ! गणेशाच्या आवडी त्याच आहेत. पण या माणसांना ते कळत नाहीय. त्यांच्या मनाचे हे सागळे खेळ आहेत. देव भक्तीचा भुकेला हे तो विसरून गेलाय. देव म्हणजे त्याला हव्यासी राजकीय नेता वाटला की काय देणग्या देऊन व घेऊन खूष होणारा. काही गर्भ श्रीमंत लोक लाखो रुपयांच्या देणग्या देतात पण गोर गरिबांना मदत करीत नाहीत...
विष्णू : ती गर्दी बघ... लोक कशी घूसाघूशी करतायत...दोन- दोन दिवसांपासून रांगेत आहेत म्हणे ते... अरे बाजूला बसलेल्या गणपतीकडं जायलाच ते तयार नाहीत. इथला आणि तिथला गणपती कधी वेगळा असते का ? कोण सांगणार हे यांना... खरच मी विटलो हे पाहून.
नारद : देवा असं पहिल्याच भेटीत खचून जाऊ नका आणखी बरंच काही आपल्याला पहायचे आहे.
तेवढ्यात मागून एक हवालदार शिट्टी मारत काठी उगारत खेकसतो 'ये चाला लायनीत व्हा...' दोघेही या प्रकाराने घाबरतात आणि तत्काळ अंतर्धान पावतात...
...........

विष्णू आणि नारद पृथ्वीच्या दौऱ्यावर...
पृथ्वीवर सध्या बरीच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र अनेक घडामोडींची इत्थंभूत माहिती भगवान विष्णूपर्यंत पोहचत नाही त्यामुळे ते सध्या फारच अस्वस्थ झाले आहेत. याच विषयावरून त्यांनी नारदांना नुकतेच फैलावर घेतले. लक्ष्मीनेही नारदाबाबत तक्रार केल्याने विष्णू अधिकच संतापले होते. 24 तास न्यूज चॅनेल पाहूनही विष्णूला आवश्यक ती माहिती मिळत नाहीय. त्यामुळे अखेर पृथ्वीवर जाऊन स्वतः:च माहिती घेण्याचे मनाशी ठरवून विष्णूंनी नारदाला सोबत घेऊन पृथ्वीवर येण्याचे ठरवले. विष्णू आणि नारद कधी अदृश्यपणे तर कधी वेश पालटून सर्व गोष्टींचा मागोवा घेणार आहेत...
(विष्णू आणि नारद यांच्या या गुप्त दौऱ्याची खबर मात्र आम्हाला सूत्रांकडून मिळाली असून त्यांच्या हलचालीची खडनखडा माहिती आम्ही वाचकांना या ब्लॉगवरून "विष्णू -नारद ' या सदरातून वेळोवेळी देत राहू जसजशी खबर मिळेल तशी वाचकांना कळवत राहू... तोपर्यंत आम्ही प्ले करतो आहोत हे एक आपल्या आवडीचे गाणे... )

Subscribe to:
Posts (Atom)