वाचक

View My Stats

Wednesday, December 30, 2009

परप्रांतीय थंडी


वूलनचा जाड स्वेटर घातलेले विष्णू कडाक्‍याच्या थंडीमुळे हातावर हात घासताहेत... सीगारेटचा धूर सोडावा तसं तोंडाने गरम वाफ बाहेर सोडत... नारदा आपण हिमालयाच्या आसपास तर नाहीना ? केवढी रे ही थंडी.


नारद : काय ? मला निटसं ऐकू आलं नाही.

विष्णू : (चिडक्‍या स्वरात ) आधी ती कानाला लावलेली 10 रुपयांची कानपट्टी काढ बघू

नारद : (इअरफोनसारखी कानपट्टी काढत) देवा, हिमालय वगैरे काही नाही आपण अजून मुंबईतच आहोत. ही उत्तरेकडची लाट आहे असं म्हणतात...

विष्णू : अरे, मागे तर सांगत होतास उत्तरेकडून लोंढे येतात. लोंढ्यामुळे इथला मराठी माणूस "परेशान" आहे. आता ही लाट कसली ?

नारद : थंडीची ! देवा उत्तरेतून परप्रांतीयांच्या लोंढ्यासोबत आता थंडीच्या लाटाही येऊ लागल्यात...

विष्णू : काय रे, या लाटेबाबात कोणी काही बोलत कसे नाही...

नारद : "मनसे'वाले साहेब उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जातात. आता थंडीच मुंबईत आलीय त्यामुळे त्यांनी या परप्रांतीय थंडीबद्दल आंदोलनाचे फर्मान काढले नाही. परप्रांतीय थंडी इथे सहन केली जाणार नाही असा इशारा दिल्याचेही ऐकिवात नाही. विरोधकांची टीका सुरूच आहे.'मनसे'वाले गारठले म्हणून ... कॉंग्रेसचे नेहमीच वेलकम आणि शिवसेनासुद्धा शेकोट्या पेटवून परप्रांतीय थंडीच स्वागत करताहेत.

विष्णू : अरे बाबा, आवर स्वतः:ला. मी तुला विचारले काय ? आणि तू बडबडत काय सुटलास... मी विचारतो हवामान खातं काय म्हणतय ? लोकांची काय प्रतिक्रिया आहे.

नारद : लोक एकदम खूष ...थर्टी फस्टच्या मुहूर्तावर थंडी हजर झाल्याने मुंबईकर खूष आहेत.

तेवढ्यात एका ठिकाणी काही लोक शेकोटी पेटवून बसलेले दिसतात... त्यात मराठी माणसासह खांद्यावर गमछा टाकलेला भय्या, आणि लूंगीवाला अण्णा सारेच असतात... नारद आणि विष्णू दोघे त्यांना जॉईन करतात....

.................

Tuesday, September 1, 2009

भक्तीच ओंगळ रूप...


गवान विष्णू नारदाला सोबत घेऊन पृथ्वीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. विष्णू आता पृथ्वीवरून परत केव्हा येतील याचा नेम नसल्याने नाराजीनंच लक्ष्मी त्यांच्या प्रवासाची तयारी करीत होती. तेवढ्यात पार्वती घाईघाईत प्रवेश करतात. विष्णूला प्रणाम करीत त्या हातातला मोदकाचा डबा पुढे करून "येवढा माझ्या गणेशाला द्या', असे आवर्जून सांगता. लवकरच परत येतो अशी लक्ष्मीची समजूत घालून विष्णू व नारदाने पृथ्वीच्या दिशेने कूच केली...

दोघेही चंद्रा जवळून जात असताना अचानक एक वेगवान वस्तू त्यांच्या जवळून निघून जाते. दोघे ही दचकून त्या दिशेने पाहत राहतात...

विष्णू : नारदा पाहिलंस काही तरी वेगाने निघून गेले. काय होते ते ?

नारद : देवा कदाचित ते भारताचे चंद्रयान असावे

विष्णू : चंद्रयान !

नारद : हो ! हल्ली माणसं अशी यानं पाठवून विश्‍वात आपल्या कोणी सोबती आहे काय याचा शोध घेत असतात. अशी अनेक यान निकामी होऊन मग अंतराळात फिरतात. येथेही नुसता कचरा झालाय पृथ्वीसारखा.
(दोघंही पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. प्रथम मुंबईत उतरतात, दोघंही सामान्य माणसाचा वेश धारण करून दृष्य स्वरूपात वावरू लागतात. )

विष्णू : अरे आपले एक महत्त्वाचे काम आधी करू. बाळ गणेशाला हे मोदक आधी पोहचते करू मग निवांतपणे फिरू (दोघेही लालबागला येतात.) कसली ही केवढी गर्दी आणि या लांबच लांब रांगा

नारद : देवा आपल्या गणेशाची भक्त मंडळी आहेत सारी. इथला गणपती नवसाला पावतो अशी यांची श्रद्धा आहे म्हणे.

विष्णू : त्या शेजारच्या गल्लीतील असणाऱ्या गणपतीकडे कोणीच जात नाहीय... हा काय प्रकार आहे. अरे आमची रूपे सारी एकच असताना. ही माणसं अशी का वागतात... आणि त्या मूर्तीच्या गळ्यात नोटांचे हार कशाला, सोनं, नाणं दान म्हणून का देतात. माला काहीच काळत नाही... आपल्या गणेशाला मोदक आणि दूर्वा सोडून हे कधी पासून आवडायला लागले.

नारद : देवा ! गणेशाच्या आवडी त्याच आहेत. पण या माणसांना ते कळत नाहीय. त्यांच्या मनाचे हे सागळे खेळ आहेत. देव भक्तीचा भुकेला हे तो विसरून गेलाय. देव म्हणजे त्याला हव्यासी राजकीय नेता वाटला की काय देणग्या देऊन व घेऊन खूष होणारा. काही गर्भ श्रीमंत लोक लाखो रुपयांच्या देणग्या देतात पण गोर गरिबांना मदत करीत नाहीत...

विष्णू : ती गर्दी बघ... लोक कशी घूसाघूशी करतायत...दोन- दोन दिवसांपासून रांगेत आहेत म्हणे ते... अरे बाजूला बसलेल्या गणपतीकडं जायलाच ते तयार नाहीत. इथला आणि तिथला गणपती कधी वेगळा असते का ? कोण सांगणार हे यांना... खरच मी विटलो हे पाहून.

नारद : देवा असं पहिल्याच भेटीत खचून जाऊ नका आणखी बरंच काही आपल्याला पहायचे आहे.

तेवढ्यात मागून एक हवालदार शिट्टी मारत काठी उगारत खेकसतो 'ये चाला लायनीत व्हा...' दोघेही या प्रकाराने घाबरतात आणि तत्काळ अंतर्धान पावतात...

...........

विष्णू आणि नारद पृथ्वीच्या दौऱ्यावर...

पृथ्वीवर सध्या बरीच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र अनेक घडामोडींची इत्थंभूत माहिती भगवान विष्णूपर्यंत पोहचत नाही त्यामुळे ते सध्या फारच अस्वस्थ झाले आहेत. याच विषयावरून त्यांनी नारदांना नुकतेच फैलावर घेतले. लक्ष्मीनेही नारदाबाबत तक्रार केल्याने विष्णू अधिकच संतापले होते. 24 तास न्यूज चॅनेल पाहूनही विष्णूला आवश्‍यक ती माहिती मिळत नाहीय. त्यामुळे अखेर पृथ्वीवर जाऊन स्वतः:च माहिती घेण्याचे मनाशी ठरवून विष्णूंनी नारदाला सोबत घेऊन पृथ्वीवर येण्याचे ठरवले. विष्णू आणि नारद कधी अदृश्‍यपणे तर कधी वेश पालटून सर्व गोष्टींचा मागोवा घेणार आहेत...
(विष्णू आणि नारद यांच्या या गुप्त दौऱ्याची खबर मात्र आम्हाला सूत्रांकडून मिळाली असून त्यांच्या हलचालीची खडनखडा माहिती आम्ही वाचकांना या ब्लॉगवरून "विष्णू -नारद ' या सदरातून वेळोवेळी देत राहू जसजशी खबर मिळेल तशी वाचकांना कळवत राहू... तोपर्यंत आम्ही प्ले करतो आहोत हे एक आपल्या आवडीचे गाणे... )

Thursday, August 20, 2009

न संपणारे प्रश्‍न...


प्रश्‍नाचे भेंडोळं माझ्या मनात खूप वाढू लागलं आहे. या भेंडोळ्यात मी गुरफटून तर जाणार नाही ना ?प्रश्‍न पडतात... पण त्याची उत्तरे मी कधी शोधणार ? की, उत्तरे आहेत माझ्याकडे पण मी ती पडताळून पाहत नाही ? पुन्हा नवा प्रश्‍न ! भर दरबारात द्रौपदीच वस्त्रहरण करणाऱ्या दुष्यासनासारखी माझी अवस्था होते. प्रश्‍नांचे भेंडोळं खेचून त्यातून उत्तराचे उघडे सत्य पाहण्याचा माझा प्रयत्न कधी तरी यशस्वी होईल का ? पुन्हा नवा प्रश्‍न. प्रश्‍न असेच न संपणारे, कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा अंत न लागणारे... कदाचित प्रश्‍नाच्या द्रौपदीला एखाद्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद असावा म्हणून ते संपता संपत नाहीत...

..............vp

Wednesday, August 19, 2009

स्वर्गाला झाला डुक्कर ताप !


(स्वर्गातील दृष्य)


भगवान विष्णू आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पहुडले आहेत. कालिया नाग त्यांच्या सेवेस तत्पर आहे. बातम्यांचा रतीब घालणाऱ्या न्यूज चॅनेल भगवान पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. लक्ष्मीही कमालीची चिंतातूर झाली आहे. नुकताच भगवान शंकरांचा फोन येऊन गेला असून पार्वतीदेखील फोनवर चिडल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मीही घाबारलीय...


लक्ष्मी : भगवान आपण नारदांना फार लाडावून ठेवलेय. वाहतुकीच्या साधनात येवढी डेव्हल्पमेंट झाली तरी नारद हल्ली पृथ्वीवरून लवकर परत येत नाहीत.


(तेवढ्यात द्वारपाल येऊन नारदमुनी आल्याची खबर देतो. तोंडाला मास्क बांधलेले नारद घाईघाईत प्रवेश करतात.)


नारद : नारायण... नारायण... (भगवान विष्णू काहीच प्रतिसाद देत नाहीत.) नारायण... नारायण... देवा, काय झालं? आमच्यावर का रागावलात?


विष्णू : नारदा, हे तुझं नेहमीचंच झालं आहे. मागंही एकदा पृथ्वीवर गेलात ते असेच उशिरा परत आलात. आम्ही काय समजायच?


नारद : क्षमा असावी भगवान. पण उशिरा झाला त्याला कारणही तसंच आहे.


विष्णू : (चिडून) का, काय झालं आता ?नारद : पृथ्वीवर खबरबात घेण्यासाठी फिरत होतो. मुंबई आणि महाराष्ट्रात जाऊन आलो तर तेथे भयानक स्थिती आढळली. "डुक्कर ताप" ( स्वाईन फ्लू ) नावाच्या रोगानं उच्छाद मांडलाय नुसता...


विष्णू : ते आम्ही पाहतोच आहोत... चॅनेलवर...


नारद : भगवंत, आम्हालाही त्या स्वाईन फ्लूने सोडलं नाही. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनच परततोय.


(नाकावर हात धरत लक्ष्मी आणि विष्णू घाबरून एकदम ओरडतात... "काय म्हणतोस नारदा..' )


नारद : घाबरू नका भगवंत, मी पूर्णपणे उपचार घेऊन आलोय. उपचारानं स्वाईन फ्लू अगदी बरा होतो.


विष्णू : (उसासा सोडून) ठीक आहे...


लक्ष्मी : (चिडून) काय ठिकाय आहे. सकाळी शंकर देवांचा फोन आलेला ते गणेशाला यंदा पृथ्वीवर पाठवायला तयार नाहीत. ते स्वाईन फ्लूची रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्याचं काय ?


विष्णू : अरे हो विसरलोच मी. हा, तर नारदमुनी आपण मला आपला स्वाईन फ्लूचा अहवाल तातडीनं सादर करा. आपल्या गणेशाची पृथ्वीवर जाण्याची वेळ जवळ येतेय तत्पूर्वी तेथील परिस्थितीची माहिती मिळाली पाहिजे मला.


लक्ष्मी : ते काही असो पण यंदा गणेशाला पाठविण्याचं धाडस करू नका. त्याला काही झालं तर शंकर पुन्हा तांडव करतील की...


विष्णू : अग गणेश तर विघ्नहर्ता आहे. भारतात त्याची लोक उत्सुकतेनं वाट पाहतायत. तो आल्यामुळं त्यांची सारी विघ्न दूर होतील अशी लोकांची श्रद्धा आहे.


(यावर सर्वांची चर्चा होते. नारद स्वाईन फ्लूची माहिती देतात. स्वर्गात त्याचा काही प्रार्दुभाव होण्याची शक्‍यता कशी नाही, असं पटवून देत असतानाच एक सेवक धावतपळत तिथं येतो. स्वर्ग आणि नरकातली काही मंडळी आजारी आहेत. त्यांना सर्दी झालीय, घसा खवखवतोय आणि तापही येतोय, अशी माहिती तो देतो. सारेजण नारदांकडं पाहतात. नारद कानावर हात ठेवतात. स्वर्गात स्वाईन फ्लू पोहचालाच कसा याची चौकशी सुरू होते. चौकशीअंती कळतं की पृथ्वीवर स्वाईन फ्लूमुळे मृत झालेल्यांपैकी काही स्वर्गात तर काही नरकात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडूनच स्वाईन फ्लू इथवर पोहचला असावा. त्यामुळं स्वर्ग आणि नरकात एकच धावाधाव सुरू झाली. स्वर्गात या रोगावर इलाज करणारे डॉक्‍टर्स नसल्याने यमाला तातडीनं बोलावणं धाडण्यात आलं. पृथ्वीवरून दोन चार डॉक्‍टर्स आजच्या आज घेऊन येण्याचं तातडीनं फर्मान भगवान विष्णूंनी काढलंय...


............ vp

Sunday, August 9, 2009

फक्त पावसाळ्यात ...

पावासाचा तो दिवस काळ्या ढगांची रेलचेल, मेघांचा गडगडाट
आठवते माला ती पिवळ्या फुलातून,
हिरव्या रानातून जाणारी नागमोडी पायवाट
भन्नाट वाऱ्याचा भलताच तोरा
ओले चिंब... कपडे तंग, प्रफुल्लित मन हातात काठी सैर निसर्गाची
दुथडी भरून वाहते सरिता तांबडा रंग पाण्याचा
वाटावा हेवा तिच्या मुक्त वाहण्याचा
माळरानावर गायीचं शेपट्या हलवीत चरनं
गोठ्यातील वासरांच हंबरणं
वाऱ्याचा घोंघावता धावता समाचार
झाड, झुडपे माना हलवून देती प्रतिसाद
हिरव्या रंगाची पृथ्वी ल्याली चादर
तांबड्या नागमोडी वाटांना हिरव्या रानाची झालर
पण... हे फक्त पावसाळ्यात
.................................vp