
प्रश्नाचे भेंडोळं माझ्या मनात खूप वाढू लागलं आहे. या भेंडोळ्यात मी गुरफटून तर जाणार नाही ना ?प्रश्न पडतात... पण त्याची उत्तरे मी कधी शोधणार ? की, उत्तरे आहेत माझ्याकडे पण मी ती पडताळून पाहत नाही ? पुन्हा नवा प्रश्न ! भर दरबारात द्रौपदीच वस्त्रहरण करणाऱ्या दुष्यासनासारखी माझी अवस्था होते. प्रश्नांचे भेंडोळं खेचून त्यातून उत्तराचे उघडे सत्य पाहण्याचा माझा प्रयत्न कधी तरी यशस्वी होईल का ? पुन्हा नवा प्रश्न. प्रश्न असेच न संपणारे, कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा अंत न लागणारे... कदाचित प्रश्नाच्या द्रौपदीला एखाद्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद असावा म्हणून ते संपता संपत नाहीत...
..............vp
No comments:
Post a Comment